शरद पवार यांचा पोलिटिकल माईंड गेम; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार

शरद पवार यांचा पोलिटिकल माईंड गेम; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अनेक नेते, खासदार, आमदार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ धरली आणि पक्षात गेले. अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत जात सत्तेत सामील झाले. दरम्यानच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्या. यामध्ये लोकसभेत शरद पवार यांच्या गटाला ८ तर अजित पावर गटाला १ जागा मिळाली. आणि विधान सभेत तर अजित पवार यांच्या शरद पवार गटापेक्षा अधिक जागा निवडून आल्या त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात म्हटजेच गटात काही ख़ुशी काही गम असे वातावरण निर्माण झाले कारण महायुतीसोबत अजित पवार पुन्हा सत्तेत आले. दरम्यानच्या काळात शरद पवार गटातील आमदार अजित पवार यांच्याकडे आपल्या मतदार संघातील विविध विकासकामांच्या निधीसाठी भेटत होते. त्यामुळे शरद पवार यांचा गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या भत्म्य अधूनमधून येताच होत्या. मात्र त्यावर काहीप्रमाणात पांघरून घालण्याचे काम दोन्ही गटाकडून केले जात होते. परंतु आता शरद पवार याना प्रसारमाध्यमांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न विचारला असता, त्यांनी त्यांचा इन्कार न करता खा. सुप्रिया सुळे याच याबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील का? पवार कुटुंबातच राजकीय कलह सुरु झालेला पाहायला मिळाला तो शमेल का? दोन्ही गटातील नेते यासाठी तयार होतील का? कि काही नागराज होऊन पक्षांतर करतील? आणि हे दोन्ही गट एकत्र आले तर राज्याच्या राजकारणातील स्थिती कशाप्रकारे बदललेली असेल? शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा हे दोन्ही पक्ष किंवा गट एकत्र येतील का? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
नमस्कार मी सुनील कोल्हे आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस….
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवार यांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरुन दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत. आणि तो वाद अद्यापही न्यायालयात सुरु आहे. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती. यामध्ये निवडणुकीतील आणि राजकीय उलथापालथ सर्वानीच अनुभवली आहे. मात्र, आता शरद पवार यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, खासदार शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही? हा निर्णय खा. सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. पक्षात दोन मत प्रवाह आहेत, एकाला वाटते अजितसोबत म्हणजेच अजित पवार यांच्यासोबत जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असं देखील पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भविष्यात उलथापालथ होण्याचे संकेत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आणि त्यांचा देखील सत्तेत वाट मागितल्यास नेमके कोणाचे नुकसान होणार? भाजपचे कि शिवसेना शिंदे गटाचे हे देखील पाहावे लागणार आहे. परंतु असे झाले तर भाजप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सत्तेतून एकतर बाहेर ठेवतील किंवा मंत्र्यांची संख्या देखील कमी होऊ शकते. तसेच अजित पवार गटाच्या मंत्र्यांचे देखील असेच काहीसे होऊ शकते. त्यामुळे खुर्ची बहाद्दर मंत्री आणि नेत्यांचे टेन्शन वाढलेले असेल.
दरम्यान शरद पवार यांनी म्हटले आहे कि, भविष्यात एकत्र यायचं की नाही? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे. आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत. आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत. होय, राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकासकामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही, त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा. म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुखयमंत्री अजित पवार यांनी तो एकत्र बसून घ्यावा असं पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात एकाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाहायला मिळेल असं सध्याच्या वातावरणावरून दिसत आहे. आणि तसे झाले तर खा. सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री असतील.
पवार यांनी पुढे बोलताना असेही म्हटले आहे कि, ज्यावेळी पक्ष उभारला त्यावेळी आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित पावर हेच एकत्र बसून निर्णय घेतील. तसेच पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटील यांनी घ्यावा. असे देखील खा. शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच इंडिया आघाडी बाबत पवार याना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ते म्हणाले कि, इंडिया आघाडी आज सक्रिय नाही. परंतु आम्हाला आमच्या पक्षाची पुनर्रचना करावी लागेल, पुनर्बांधणी करावी लागेल, तरुणांना त्यात सामील करावे लागेल आणि काम करावे लागेल. तसेच त्यांनी आमचा विचार विरोधी पक्षात काम करण्याचा आहे. आपण भाजपला एक विश्वासार्ह पर्याय निर्माण केला पाहिजे, अशी भूमिका देखील खा. शरद पवार यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे शरद पवार यांनी नेहमीच्या राजकीय माइंडगेमने संभ्रम मात्र कायम ठेवला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणाच्या शक्यतेने आणि भाजप विरोधी पर्याय देण्याच्या दुहेरी वक्तव्याने राजकीय पक्ष, नेते, राजकीय जाणकार आणि सर्वसामान्यांना देखील प्रश्न पडला असेल कि, पवार यांच्या डोक्यामध्ये नेमके चाललेय काय……
दरम्यान पवार यांच्या या वक्तव्याने शिवसेना खा. संजय राऊत यांनी काहीशी नाराजी व्यक्त करत आपण यावर शरद पवार आयांच्यांशी बोलणार असल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवलाय. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशीच इच्छा मी व्यक्त करतो. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे, पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या घरातच वाढलेत, त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज आहे, असं वाटत नाही.
तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे कि, शरद पवार हे मोठे नेते, आहेत. त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत असेल. त्यांच्या अनुभवाचा राज्य सरकारला फायदा होईल. पवार आता नवीन नेतृत्वाच्या हाती सत्ता देऊ पाहत आहेत. नव्या नेतृत्वाला संधी देऊ पाहत आहेत. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे. राष्ट्रवादीचे नेते जर महातुतीत आले तर त्यांचे 100 टक्के स्वागत आहे