“झपुक झुपक”ची प्रेक्षकांवर जादू…!

"झपुक झुपक"ची प्रेक्षकांवर जादू...!
सूरज चव्हाण या एका सामान्य घरातील पोरान रिल्सस्टार ते अभिनेता हा प्रवास अकल्पनीय असाच आहे. ‘झापुक झुपूक’च्या केंद्रस्थानी असलेला हा सोशल मीडिया रीलस्टार ‘टिकटॉक’च्या व्हिडिओपासून ‘बिग बॉस मराठी’च्या घरापर्यंत येऊन पोहोचला आणि आता तो सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकतोय. ही झेप अवघ्या मनोरंजनसृष्टीला आणि प्रेक्षकांनाही चकित करणारी आहे. अभिनयाच्या किंवा नायकाच्या कोणत्याच चौकटीत न बसणाऱ्या सूरजला लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मोठ्या धाडसाने संधी दिली. त्यांनी आपला पूर्ण विश्वास, मेहनतीने कमी कालावधीत चित्रपटाची घोषणाही केली, आणि ती पूर्णत्वास देखील नेली. काही महिन्यात तयार झालेला कलात्मक, उत्तम, आणि दर्जेदार असाच हा चित्रपट आहे. झापून झुपक हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. आता तीन दिवस होऊन गेले आहेत. या चित्रपटाने तीन दिवसात किती कामे केली? सुरज चव्हाण आणि इतर कलाकार यांच्या भूमिका, चित्रपटाच्या इतर बाजू याबाबत अधिक जाणून घेणार आहोत.
आपल्या गावरान परंतु विक्षिप्त आणि तेवढ्याच विनोदी शैलीने डायलॉगबाजी यामुळे ‘झापुक झुपूक’चा नायक सूरज म्हणजेच (सूरज चव्हाण) त्याच्या गुलिगत स्टाइलमध्ये संपूर्ण सिनेमात वावरताना आपलयाला दिसतो. त्याची भाषा, देहबोली याच्या सहजतेने प्रत्येकाला आपल्या अवतीभवती असं एखादं पात्र नक्कीच सापडत. या सिनेमामध्ये त्याने उत्तम अभिनय केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे २४ लाख, दुसऱ्या दिवशी २४ लाख तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी १९ लाख एवढी कमाई केली आहे. काहींनी तर चित्रपटाला फ्लॉप म्हटले तर काहींनी प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली असल्याचे म्हटले आहे. परंतु आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहांमध्ये होताना दिसत आहे.
या चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचे झाले तर, हि एक प्रेमकथा आहे. निरक्षर सूरज गावच्या शाळेत शिपाई म्हणून कामाला आहे. शाळेत नव्यानं रुजू झालेल्या तरुण देखण्या नारायणी म्हणजेच (जुई भागवत) या शिक्षिकेकडे तो पाहताक्षणी आकर्षित होतो. पण तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते. अगदी ‘नारायणी’चं ‘नानायणी’ होऊन जातं. या ‘नानायणी’ सोबत लग्न करण्याचं स्वप्न तो पाहू लागतो. तिच्यवरच आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सुरज लव्हलेटरचा आधार घेतो. सुशिक्षित आणि चित्रकार असलेल्या शेखरकडून (इंद्रनील कामत) सूरज प्रेमपत्र लिहून घेतो. दरम्यान नारायणीचं भूतकाळातील प्रेमप्रकरण रंजकतेनं समोर येतं. त्या जुन्या प्रेमप्रकरणातल्या गुलिगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईला शिकायला गेलेली असते. आता शिक्षिका होऊन ती गावी परतली आहे. ही नारायणी सूरजचं प्रेम स्वीकारते, की त्याला गुलिगत धोका देते? आमदार असलेले नारायणीचे वडील पंजाबराव पाटील (मिलिंद गवळी) या प्रेमप्रकरणात कसा अडथळा आणतात? सूरजची प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात? या आणि इतर प्रश्नांची उत्तरं रंजक पद्धतीनं या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतात.
केदार शिंदे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत, मराठी संस्कृती आणि कौटुंबिक भावनांना स्पर्श करणारा चित्रपट बनवला आहे. त्यांनी सूरजच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला, ज्यामुळे तो नवखा वाटत नाही. तसेच सूरजचा संघर्ष आणि त्याच्या अपयशाची कथा साध्या पद्धतीनं सांगताना त्यातून एक मोठा संदेश आपसूक मिळतो. त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साजेसे असल्यानं ते
खरेखुरे वाटतात. केदार शिंदे यांनी आपल्या कौशल्याने दर्जेदार दिग्दर्शन केले असून सर्व पात्रांना न्याय दिला असून कथेला देखील न्याय दिला आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना रटाळपण वाटत नाही. चित्रपटातील गाणी खूपच छान झाली आहेत. झापून झुपक, वाजिव दाद्या, असे सर्वच गाणी प्रेक्षकांना खोलवून ठेवतात. झापूनझुपक हा तर ट्रेंडच झाला आहे.
दरम्यान सूरज चव्हाणने आपल्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेला सिनेमात यशस्वीपणे उतरवले आहे. त्याचा नैसर्गिक, गावठी अभिनय आणि विनोदी संवाद प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. विशेषतः त्याच्या बहिणीच्या (पायल जाधव) सोबतचा भावनिक प्रसंग लक्षवेधी आहे. दिग्दर्शकानं सुरजवर घेतलेले श्रम जाणवतात. जुईनं नारायणीची भूमिका उत्तमपणे साकारली आहे, योग्य न्याय दिला आहे. ती पडद्यावर सहजतेनं वावरली आहे. पण, काही महत्त्वपूर्ण प्रसंगात ती एकांगी वाटते. शेखरच्या भूमिकेत इंद्रनील कामतनं समाधानकारक काम केलं आहे. मुख्याध्यापकाच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकरनं मजा केलीय. राजकुमार या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी हेमंत फरांदेला फारसा वाव मिळालेला नाही.मात्र त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. नारायणाची सावत्र आई वृंदा (दीपाली पानसरे) आणि वडील पंजाबराव पाटील (मिलिंद गवळी) साहाय्यक भूमिकांपुरते मर्यादित असल्याचे जानवते. सूरजच्या शाळकरी मित्रमैत्रिणींनी मात्र चित्रपटामध्ये रंगात आणली आहे. त्याच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या पायल जाधवनं अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
चित्रपटाची तांत्रिक बाजू पाहायची झाले तर, चित्रपटाची छायांकन, संपादन आणि व्हीएफएक्स (विशेषतः सूरजवीरच्या दृश्यांमध्ये) उल्लेखनीय आहेत. मराठी चित्रपटांमध्ये अलीकडच्या काळातील काही सर्वोत्तम अॅक्शन आणि व्हीएफएक्स दृश्ये यात पाहायला मिळतात. संगीतही कथेला पूरक आहे, विशेषतः ‘झापुक झुपूक वाजतंय ग’ हे गाणे लोकप्रिय ठरले आहे.
एकंदरीत मूल्यमापन करायचे झाले तर ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट सूरज चव्हाणच्या चाहत्यांसाठी आणि हलक्या-फुलक्या मनोरंजनाच्या शोधात असलेल्या प्रेक्षकांसाठी एक मजेदार अनुभव आहे. सूरज चव्हाण हा चित्रपटाचा खरा स्टार आहे, जो आपल्या विनोदी शैलीने आणि साधेपणाने प्रेक्षकांचे मन जिंकतो. तथापि, कथानकाची साधारणता आणि काही पात्रांचा कमी अधिक वावर यामुळे चित्रपट पूर्णपणे समाधानकारक ठरत नाही. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन आणि चित्रपटाची तांत्रिक बाजू याला नक्कीच उंचावतात, पण कथेत आणखी खोली हवी होती. असे म्हटले जाते. परंतु जर तुम्ही सूरज चव्हाणचे चाहते असाल किंवा कौटुंबिक, विनोदी मराठी चित्रपट पाहण्याची इच्छा असेल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. थिएटरमध्ये कुटुंबासह हा हलका-फुलका मनोरंजनाचा आनंद घ्या. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उशिरा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शुक्रवारी चित्रपट रिलीझ झाला मात्र चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून गर्दी कमी असल्याचे जाणवले.परंतु शनिवार आणि रविवारी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे म्हटले जात आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे, कि, बिगबॉस वेळी सूरजला ज्यापद्धतीने त्याच्या फोल्लोवर्स आणि प्रेक्षकांनी प्रेम दिले त्यापद्धतीने चित्रपटासाठी होताना दिसत नाही. परंतु तुम्हाला काय वाटतेय ते सांगायला मात्र विसरू नका