सई ताम्हणकर एक्सेलसोबत करणार “अग्नी” “डब्बा कार्टेल”

साई ताम्हणकर एक्सेलसोबत करणार "अग्नी" "डब्बा कार्टेल"
सई ताम्हणकर हि मराठी सेनेने हृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तीने काही दिवसापूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती. ‘भक्षक’ या हिंदी वेब शो नंतर आता सई ‘अग्नी ‘ साठी सज्ज झाली आहे. सई बॉलिवूड मध्ये आता स्थिरावताना दिसत आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर ” डब्बा कार्टेल “ रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे.
आंतरराष्ट्रीय फायर फायटर ” दिवशी सईने ‘अग्नी’ च पोस्टर शेयर केलं आहे. प्रतीक गांधी , जितेंद्र जोशी , दिवेंद्यू , सयामी खेर अशी तगडी स्टाकास्ट असलेला ‘अग्नी ‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साई च्या या प्रोजेक्टची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
प्रतीक गांधी या बड्या कलाकारांसोबत सई या आगामी ” अग्नी ” मध्ये दिसणार असून तिच्यासाठी हा प्रोजेक्ट खास आहे असल्याची भावना सईने व्यक्त केल्या आहेत. ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या व्यतिरिक्त सई ‘डब्बा कार्टेल’ मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर ” डब्बा कार्टेल ” रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.