अहमदनगर – बीड लोकसभेसाठी चुरशीची लढत ! विखे – मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला !

अहमदनगर - बीड लोकसभेसाठी चुरशीची लढत ! विखे - मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला !
प्रचारतोफा थंडावल्या; लंके – सोनावणे यांची विरोधकांसोबत जोरदार फाईट !
सुनील कोल्हे
अहमदनगर – बीड – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत मात्र बीड आणि अहमदनगर येथील निवडणूक हि चांगलीच चुरशीची होणार आहे. अहमदनगर येथे भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची तर बीड येथे भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अहमदनगर येथे सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे (sp) निलेश लंके यांच्यात मुख्य निवडणूक होणार आहे. तर बीड येथे पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे (sp) बजरंगबाप्पू सोनावणे यांच्यात मुख्य आणि चुरशीची निवडणूक होणार आहे. तसेच बीडमध्ये वंचितने उमेदवार उभा केल्याने निवडणुकीची रंगात वाढली आहे. आज दि. ११ मे रोजी नगर आणि बीड येथे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा झाल्या त्यात निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी विजयी सभा घेतली. तसेच अहमदनगर येथे उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यामंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदींनी सभा घेतल्या. तर जिल्यातील माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, आ. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, विकी पाचपुते, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, अभय आगरकर, भैया गंधे यांनी प्रचार सभा, घोंगडी बैठक आदी प्रकारे प्रचार करून विखे याना निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच विखे कुटुंबीय देखील प्रचारात हिरीरीने सहभागी झाले होते. तर निलेश लंके याच्या प्रचारसभेसाठी आणि प्रचारासाठी राष्ट्रवादीचे (sp) शरद पवार, काँग्रेसचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, खा. अमोल कोल्हे आदी. आले होते. तर स्थानिक पातळीवर लंके यांच्यासोबत वृद्धेश्वर सहकारी कारखान्याचे प्रताप ढाकणे, शिवसेनेचे रफिक शेख, बाळासाहेब हराळ, माजी महापौर चव्हाण, अभिषेक कळमकर, शिवसेनेचे शशिकांत गाडे, संदेश कार्ले आदी सहभागी होत निलेश लंके यांच्यासाठी प्रचार केला आणि जनतेला निवडून देण्याचे आवाहन केले.
तसेच बीड येथे पंकजा मुंडे यांच्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यामंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, खा. उदयनराजे भोसले आदीनी प्रचार सभा घेतल्या तर स्थानिक पातळीवर आ. सुरेश धस, माजी आ, भीमराव धोंडे. आ. अजबे यांच्यासह आजी माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आदींनी प्रयत्न केले. तर राष्ट्रवादीचे (sp) बजरंगबाप्पू सोनावणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आ. रोहित पवार, आदींनी प्रचारसभा घेऊन गेवंडून देण्याचे आवाहन जनतेला केले.
दरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील डॉ. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशीच दुरंगी लढत होणार आहे, येथे मात्र मराठा आरक्षण फॅक्टरसह मोदी सरकारने घेतलेले अनेक निर्णयाविरुद्ध असंतोष असल्याने आणि विखे आरक्षणावर बोलत नसल्याने त्यांना हि निवडणूक जास्तच जड जात आहे असेच चित्र आहे. तर निलेश लंके यांनी कोविड काळात चांगले काम केल्याने त्यांच्याबाबत सहानुभूतीचे वातावरण आहे, मात्र विखे यांनी देखील आपल्या काळात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबत देखील काहीशी सहानुभूती आहे. तर बीड येथे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यात मुख्य लढत होणार आहे, दोन्ही बाजूने जोराचा प्रचार करण्यात आला आहे मात्र येथे मराठा आंदोलनाचा फटका मुंडे याना बसणार आहे, असे काहीसे चित्र आहे, तर सोनावणे नयांच्यासाठी सहानुभूतीचे बाटवरण लोकांमध्ये आहे, तसेच जातीय रंग येथील निवडणुकीला लागल्याचे देखील बोलले जात आहे, येथे विकासाचे, भावनिकतेचे मुद्दे प्रचारात वापरल्याचे पाहायला मिळाले. नगरमध्ये देखील याचप्रकारे काहीसे चित्र आहे. आज दि. ११ मे रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे येत्या ४ जून रोजी काय निकाल लागणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
नगर येथील सभेदरम्यान विखे यांच्या प्रचारसभेत लंके याना खूप शिकायच आहे, त्यांचा हेडमास्तर मीच आहे, त्यामुळे त्यांनी वेळ घ्यावा, शिकावे .. यावेळी डॉ. सुजय विखे याना निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पंतप्रधान मोदी आणि विखे यांनी केलेला विकास आणि मोदी याना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. तर उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नोळवंडे धारण आणि साक्लीचा प्रश्न सोनवणार आहे आणि जिल्याच्या विकासासाठी ३ MIDC मंजूर केल्याचे म्हटले आणि मोदी पंतप्रधान झाले कि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करू असे म्हटले आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यानच्या लंके यांच्यासाठी खा. शरद पवार आणि सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी प्रचारसभा घेऊन मोदी सरकार आणि त्यांचे धोरण जनतेसमोर मांडले, बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणुकीत लंके यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन लंके याना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच यानिमित्ताने विखे -पवार आणि विखे -थोरात वाद पुन्हा एकदा रेखांकित झाला. बीडमध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळाले.
या मुद्यांचा उल्लेख देखील नाही
निवडणुकीच्या निमित्ताने, शेतकरी, शेतमालाला हमीभाव, बेरोजगारी, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था, विकास -उद्योग, आरक्षण आदी मुद्दे मात्र मागेच पडलेले पाहायला मिळाले.
४ जूनचा योग, … मी अगोदरच ओबीसी, जातीपातीचे राजकारण बीडलाच का : मुंडे
४ जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि याच ४ जून रोजी मी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यावर अंत्यसंसकार केले आहेत, त्यांचे अपूर्ण काम करण्यासाठी मला निवडून द्या, याच मतदारसंघात जातीपातीचे राजकारण का? असा सवाल उपस्थित करत आल्याला एक साधी द्यावी, मराठा समाजाला जेव्हा विचारते तेव्हा ते म्हणतात कि आम्हाला आरक्षण पाहिचे, म्हणजेच कुणबी सर्टिफिकेट पाहिजे, अरे मी अगोदरच ओबीसी आहे ना असे मुंडे यांनी आपल्या भाषणावेळी म्हटले आहे.
शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेणाऱ्यांना सहकार्य करा : पवार
शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार पुढे घेऊन जाण्याची आज गरज आहे, मग ते मनोज जरांगे असो की, आणखी कोणी असो, तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे या जिल्ह्यात येऊन जरांगे पाटलांना भेटलो. त्यांना एक विनंती केली की, या राज्यात कोणताही जातीचा किंवा धर्माचा असो त्या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेऊ”, असे राष्ट्रवादीचे (sp) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
… तर राजीनामा देईन, उदयनराजे भावुक
तुम्ही मतदान केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिथून (सातारा) पुन्हा पंकजा ताईला निवडून देईन. कृपा करुण माझ्या बहिणीला निवडून द्या. मी आलोय ताईसाठी नीट वागा. ही प्रचारसभा नाही तर ही विजयी सभा आहे.” कडा येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेप्रसंगी उदनराजे भोसले बोलत होते, ते भावुक झाले होते, त्यातच पंकजा मुंडे यांना देखील आश्रू आनावर झाले होते. बीड येथे मराठा आरक्षणामुळे हि निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. त्यामुळे मतदार उदयनराजे भोसले यांचे ऐकतात कि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे ऐकतात हे पाहावे लागेल.
हिंगे यांची आरक्षणाची बॉण्डपेपरवर हमी
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी बीड लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात आहेत, त्यांनी मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाबाबतच्या आरक्षणाची हमी थेट बॉण्डवर लिहून जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जो उमेदवार आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करील, त्याच्या पाठिशी मराठा समाज उभा राहील असे म्हटले होते. अशोक हिंगे पाटील यांनी आपली भूमिका बॉण्डवर लिहून देत स्पष्ट केली. तसेच, हे शपथपत्र जरांगे पाटलांपर्यंत पोहोचविणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मनोज जरंगे पाटील आणि मराठा समाज यांच्या निर्णायक भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, हिंगे यांच्या या भूमिकेमुळे नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.
मुंडे, क्षीरसागर कुटुंब सत्तेत, मग मराठा – ओबीसी वाद कुठेय : जरंगे पाटील
मराठ्यांचा विरोध किंवा ओबीसी मराठा वाद असता तर मुंडे साहेबांना एवढ्या मतांनी निवडून दिलेच नसतं. त्यांच्या मुलीला दोनदा खासदार आणि पुतण्याला आमदार केलं नसतं. तसेच त्यांच्या मुलीला म्हणजे पंकजा मुंडेंना आणि केशर काकू क्षीरसागर यांना आमदार केलं नसतं, तसेच, मुंडे कुटुंबीयांना पिढ्यानपिढ्या निवडून देण्यात येत आहे, त्यामुळे येथे जातीय राजकारण कसे? असा सवाल उपस्थित करत विरोधकांना चांगलाच टोला मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी लगावला