होमगार्डना १८० दिवस काम द्यावे : आ. तांबे

होमगार्डना १८० दिवस काम द्यावे : आ. तांबे
मुंबई – राज्याच्या पोलिस दलातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता राज्य गृहरक्षक दलाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. राज्यात जवळपास 53,000 होमगार्ड असून सण-उत्सव, आपत्ती व्यवस्थापन अशा प्रसंगी या होमगार्ड्सनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना गृहमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुमारे १८० दिवस काम द्यावे अशी मागणी आ. सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेत केली.
दरम्यान केवळ गरज पडेल तेव्हाच काम हे धोरण न राबवता वर्षातील किमान 180 दिवस होमगार्ड्सना काम दिलं जाईल अशी घोषणा गृहमंत्र्यांनी मागील हिवाळी अधिवेशनात केली होती, मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. याची तातडीने अंमलबजावणी करावी व होमगार्ड्सना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आ. तांबे यांनी केली. त्यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.