दुधाला स्थायी भाव ३० रुपये; ना. विखे यांची दुग्ध व्यावसायिकांशी बैठक

दुधाला स्थायी भाव ३० रुपये; ना. विखे यांची दुग्ध व्यावसायिकांशी बैठक
Mumbai – शेतकऱ्यांना दुधाचा समान 30 रुपये स्थायी भाव मिळावा यासाठी दूध व्यावसायिकांसमवेत आज सह्याद्री अतिथीगृह येथे महसुल तथापशु व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा समान 30 रुपये भाव मिळाला पाहिजे अशा सूचना व्यवसायिकांना दिल्या. तसेच दूध व्यावसायिकांच्या इतर अडचणी देखील समजून घेत त्या अडचणींवर मात करण्यासाठी शासनाकडून योग्य ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त श्री. प्रशांत मोहोड, दूध व्यवसाय संघाचे प्रतिनिधी व पशु संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.