14/02/2026

बांधकाम कामगारांसाठी तालुकास्तरावर सुविधा केंद्र ; मुख्यामंत्री शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

0
bandhkam kamgar

बांधकाम कामगारांसाठी तालुकास्तरावर सुविधा केंद्र; मुख्यामंत्री शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील तालुकास्तरावर सुरु करण्यात आलेल्या तालुका कामगार सुविधा केंद्रांचे (सेतु) आज दि. ५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी बांधकाम कामगारांच्या सुविधेकरिता तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमास मंत्री दादा भुसे, संजय राठोड, अतुल सावे, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed