मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – पाटील यांची भेट

0
Vinod Patil

मराठा आरक्षण याचिकाकर्ते तथा मराठा समन्वयक विनोद पाटील

पाटील “छ. संभाजीनगर”मधून लोकसभा निवडणूक लढणार?

मराठा आरक्षण याचिकाकर्ते तथा मराठा समन्वयक विनोद पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांची आज दि. १५ एप्रिल रोजी औरंगाबाद येथे भेट झाली. यावेळी दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली, त्यात पाटील यांनी येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चाच झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Vinod Patil

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यातील मतदानास आता चार दिवस राहिले आहेत. परंतु महायुतीमधील आठ जागांवर निर्णय झालेला नाही. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेवर एकमत होऊ शकले नाही. परंतु जी जागा शिवसेनेला मिळणार आहे, त्याठिकाणी उमेदवार जाहीर होऊ शकले नाही. त्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपकडून तीन नावे चर्चेत आहेत. त्यातील मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

दरम्यान येथून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खा.चंद्रकांत खैरे याना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच येथून मंत्री संदीपान भुमरे आणि भाजप नेते भागवत कराड यांचे नाव चर्चेत आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता आहे.

पाटील यांचे शक्तीप्रदर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी बुलढाणा येथून मुंबईकडे रवाना होताना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले होते. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उत्सुक असलेले विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी विनोद पाटील समर्थकांनी ‘हमारा खासदार कैसा हो, विनोद पाटील जैसा हो’ च्या घोषणा दिल्या. विनोद पाटील यांनी शक्तीप्रदर्शनच केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.