रेल्वेची नवी योजना : एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस !

0
Railway 1

रेल्वेची नवी योजना : एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस !

Railway News – भारत देशात अजूनही भारतीय रेल्वे हा सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम पर्याय म्हणून मानला जातो. रेल्वेचे सर्वाधिक जाळे भारतात पसरलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकार रेल्वेच्या दोन मोठ्या योजनांवर काम करत आहे. या योजनेमध्ये रेल्वेचा उन्नत मार्ग उभारण्याचा संकल्प आहे. या योजनेमुळे बुलेट ट्रेन, हायस्पीड, सेमी हायस्पीड आणि नॉर्मल स्पीड ट्रेनसाठी वेगळे ट्रॅक न बनवता सर्व स्पीड ट्रेन एकाच ट्रॅकवर चालवण्याचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी विद्यमान संसाधनांचा सर्वोत्तम कसा उपयोग करता येईल हे सांगितले असून भविष्यात नवीन रेल्वे मार्ग हे उन्नत रेल्वे ट्रॅक असणार आहे. यासाठी रेल्वेचा प्रयत्न असून यासाठी मसुदाही तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅकची उंची जमिनीपासून चार मीटर उंच ठेवण्यात येणार आहे. यामध्ये एलिव्हेटेड ट्रॅकची रचना सिंगल किंवा डबल लाईननुसार न करता चार लाईननुसार केली जाईल जेणेकरून कमी खर्चात जास्तीत जास्त गाड्या चालवता येणार आहेत. असे संबंधित अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच परदेशातील प्रकल्पाच्या डर्टीवर हा प्रकल्प असणार आहे.

उन्नत रेल्वे रुळांच्या बांधणीमुळे गाड्यांची गती वाढेल. तसेच रेल्वे रद्द, लेटमार्क याचे प्रमाण कमी होईल. उंचावलेल्या ट्रॅकमुळे त्यांना कुंपण घालणे देखील सोपे होईल, जे जमिनीवर बांधल्यास सध्या शक्य नाही. जिथे रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना काटेरी तारांचे कुंपण किंवा भिंती बांधते, लोकवस्तीच्या भागात अनेक ठिकाणी लोक त्यांच्या प्रवासासाठी मार्ग काढण्यासाठी त्यांना तोडतात. जुना रेल्वे मार्ग हळूहळू उन्नत करण्याची योजना आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.