२ हजारांच्या ९७.७६ टक्के नोटा आरबीआयकडे जमा; पुन्हा होणार नोटबंदी ?

२ हजारांच्या ९७.७६ टक्के नोटा आरबीआयकडे जमा; पुन्हा होणार नोटबंदी ?
RBI NEWS – आरबीआयने काही महिन्यांपूर्वी २ हजार रुप्याच्या नोटा पुन्हा मागितल्याने पुन्हा नोटबंदी होते कि काय अशी भीती देशातील नागरिकांना होती मात्र पुन्हा नोटबंदी करणार नसल्याचे RBI ने म्हटले होते, परंतू दोन हजार रुपयांच्या 97.76 टक्के नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत. आणि अद्यापही 7 हजार 961 कोटी रुपयांच्या नोटा चलनात असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. तसेच उर्वरित नोटा जमा करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
RBI ने मे 2023 मध्ये 2000 रुपयांच्या नोटा परत मागवल्या होत्या. तेव्हा चलनात 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2 हजारांच्या नोटा होत्या. मात्र, RBI च्या नवीन आकडेवारीनुसार देशातील चलनात सध्या 7,961 कोटी रुपये आहेत. गत वर्षभरात तब्बल 97.76 टक्के नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत. दरम्यान, सध्या 2 हजार रुपयांची नोट वैध मानली जात असून चलनात अस्तित्वातही आहे. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचे आरबीआयचे आवाहन आजही कायम असल्याचे सांगण्यात आले आहे. आरबीआयच्या 19 कार्यालयात किंवा स्पीड पोस्ट करत नागरिकांना 2 हजार रुपयांच्या नोटा बदलवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता उर्वरित नोटा RBI कडे जमा करण्या लागणार आहेत. या नोटा जमा झाल्यानंतर देशात पुन्हा नोटबंदी लागू होते कि काय असा कयास लावला जात आहे.