अडानीना सेबीचा झटका; ६ कंपन्यांना नोटीस!

अडानीना सेबीचा झटका; ६ कंपन्यांना नोटीस!
ADANI – SEBI NEWS – भारतातील प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्या 6 कंपन्यांना बाजार नियंत्रक सेबीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे उद्योगजगतात खळबळ उडाली आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासंबंधीच्या काही शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुलासा मागविण्यात आला आहे. अडाणी ग्रुपच्या एकूण १० कंपन्या यामध्ये सूचिबद्ध आहेत.
सेबीने पाठवलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे कि, कंपन्यांनी रिलेटेड पार्टी व्यवहारांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. रिलेटेड पार्टी व्यवहार म्हणजे यापूर्वी दोन कंपन्यांनी आप-आपसात केलेला व्यवहार, दोन कंपन्यांमध्ये पूर्वीपासूनच व्यवहार होत असल्यास त्याला रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन असे म्हटले जाते.
सेबीने अदानी ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेसला दोन नोटीस पाठवल्या आहेत. याशिवाय अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्यूशन्स, अदानी विल्मर आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. यावेळी कंपनीचे कायदेशीर सल्लागार यांनी याचा कंकपनीवर काहीही फारसा परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच अधिकची माहिती देण्यास नकार दिला आहे.