वंदे भारत मेट्रो देशभरात धावणार; यादिवशी होणार चाचणी

वंदे भारत मेट्रो देशभरात धावणार; यादिवशी होणार चाचणी
VANDE BHARAT METRO NEWS – वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन नंतर आता वंदे भारत मेट्रो देशातील अनेक शहरांत धावताना दिसणार आहे. या मेट्रोचे काम पंजाबमधील कपूरथला येथली रेल्वे कोच फॅक्टरीत सुरु आहे. ही मेट्रो इंटर सिटी आणि इंट्रा सिटींमध्ये धावणार आहे. जुलै 2024 पासून वंदे भारत मेट्रोची चाचणी घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
वंदे मेट्रो ताशी 130 किलोमीटर वेगाने धावू शकते. मेट्रो नेटवर्क देशातील 100-125 किलोमीटर अंतरावरील जवळपास 124 शहरांना जोडणार आहे. त्यामुळे दळणवळण सुधारणार आहे.
दरम्यान या मेट्रोमध्ये युनिक कोच कॉन्फिगरेशन आहे. या मेट्रो ट्रेनमध्ये कमीत कमी 12 कोच असतील. या 12 कोचसह वंदे मेट्रोची सुरुवात होईल. भविष्यात 16 कोचपर्यंत ही संख्या वाढविण्यात येऊ शकते. ट्रायल रन नंतर वंदे भारत मेट्रो संपूर्ण देशभर सुरु करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधेसह वेळ वाचणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने देशभरातील 124 शहरांना जोडण्यासाठी वंदे मेट्रो ट्रेन सुरू केली. सुरुवातीच्या मार्गांनुसार, चेन्नई-तिरुपती, भुवनेश्वर-बालासोर, आग्रा-मथुरा, दिल्ली-रेवाडी आणि लखनौ-कानपूर हे वंदे मेट्रोने कव्हर केले जातील.