अहमदनगरच्या ढाकणेंना EVM हॅक प्रकरणी पुण्यात अटक

श्रीरामपुरात मुख्याध्यापिकेस ४५ हजारांची लाच घेताना पकडले
DANVE EVM NEWS – छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील ईव्हीएम हॅक करतो म्हणत शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अंबादास दानवे याना सुमारे २.५ कोटी रुपयांची मागणी केली. याप्रकरणी अहमदनगर जिह्यातील काटेवाडी येथील मारुती ढाकणे याना पुणे येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचत अटक केली.
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे ईव्हिएम आहेत, ते सर्व हॅक करुन तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना मारुती नाथा ढाकणे याने फोन केला होता, त्यासाठी सुमारे अडिच कोटी रुपयांची मागणी दानवे यांच्याकडे करण्यात आली होती. ढाकणे हा अहमदनगर जिल्यातील काटेवाडी येथील रहिवाशी आहे. दानवेंना याबाबत संशय आणल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सापळा रचत पुण्यातील एका हॉटेलमध्ये मारुती ढाकणे याला पैसे घेताना रंगेहात पकडले. याबाबत पुढील कारवाई पोलिसांकडून सुरु आहे. याकामी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी देखील सहकार्य केले
कर्जामुळे ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर
ढाकणे हा भारतीय सैन्यात जवान असून जम्मू काश्मीरमध्ये सध्या तो ड्युटीला आहे. त्याच्यावर मोठे कर्ज झाले असल्याने भामटेगिरी करून बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. प्रत्यक्षात ईव्हीएम हॅक करण्यासंदर्भात कुठलेही नॉलेज नाही. त्याच्यावर कर्ज झालेले होते ते पैसे कुठून तरी मिळावे त्यासाठी त्याने हे सर्व केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे.