दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात १२ टक्क्यांची वाढ ; राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात १२ टक्क्यांची वाढ ; राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय
EDUCATION NEWS – देशभरात महागाई वाढत असतानाच राज्यात मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. जुलै ऑगस्ट 2024 आणि मार्च 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी सुमारे12 टक्के शुल्कवाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी हि शुल्कवाढ १० टक्के एवढी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या खिशाला देखील भार वाढणार आहे. यशुल्कवाढीसंदर्भात संबंधित विभागाकडून सूचना राज्यातील शाळा आणि महाविद्यालय याना पाठवण्यात आल्या आहेत.
दरम्यान दहावीसाठी 420 रुपयांऐवजी 470 तर बारावीला 440 रुपयांऐवजी 490 परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहे. या परीक्षा शुल्कासोबतच प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यासाठीही विद्यार्थ्यांना फी भारवी लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षण महाग होत चालले आहे.
खासगी विद्यार्धी नोंदणी शुल्क आता 1210 रुपये असणार आहे. तर परीक्षा शुल्क 470 रुपये असणार आहे. पुन्हा परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 470 रुपये असेल. तर प्रशासकिय शुल्क व गुणपत्रिका शुल्क प्रत्येकी 10 रुपये घेतले जाणार आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 10 रुपये आणि तंत्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. श्रेणी सुधार योजनेसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे 930 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.