एनबीएफसीना २० हजारच्यावर कॅश लोन देता येणार नाही; RBI चे निर्देश

एनबीएफसीना २० हजारच्यावर कॅश लोन देता येणार नाही; RBI चे निर्देश
RBI NBFC LOAN NEWS -भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन आदेश जारी केला आहे. त्या आदेशानूसार आता कोणत्याही (एनबीएफसी) नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या ग्राहकांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश लोन मिळणार नाही. किंवा कंपनीला देखील ते देता येणार नाही. आयकर अधिनियम, 1961 च्या नियम 269 SS अंतर्गत कोणत्याही ग्राहकाला आता 20 हजार रुपयांपेक्षा जादा कॅश लोन म्हणून मिळणार नाही त्यामुळे ग्राहकांची चांगलीच अडचण होणार आहे. त्याबाबतचा आदेश RBI ने काढला असून त्याबाबत सर्व NBFC ला निर्देश दिले आहेत.
दरम्यान एनबीएफसी कंपन्या धोक्यात येऊ नयेत. त्यांना अधिक जोखमीचा सामना करावा लागू नये आणि नियमांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. आयआयएफएल फायनान्स या एनबीएफसी कंपनीवर अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होत असताना आरबीआयने हे निर्देश जारी केले आहेत. या अहवालात काही कंपन्यांनी कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रोखीने कर्जे दिली आणि जमा केल्याचे म्हटले जात आहे. तसेच IIFL कंपनीला आता नवीन ग्राहकांसाठी त्यांचे सोने कर्ज वाटप व्यवहार तातडीने थांबवण्याचे आदेश देखील RBI NE दिले आहेत.