शिक्षक व पदवीधरसाठी निवडणूक जाहीर ; १३ जूनला निकाल

शिक्षक व पदवीधरसाठी निवडणूक जाहीर ; १३ जूनला निकाल
ELECTION NEWS – लोकसभा निवडणुकी पाठोपाठ राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर करण्यात आल्या आहेत, शिक्षक दोन पाहणी पदवीधर दोन अशा एकूण ४ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार आहे. राज्यातील चार जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे.
तसेच विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या चारही जागांवरील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ हा येत्या ७ जुलै रोजी संपणार आहे. या चार जागांसाठी १० जूनला मतदार होणार आहे. तर १३ जूनला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकाल ४ जूनला लागणार आहे, त्यावरून या पुकधील निवडणुकीचा कयास लावला जात आहे.