जिल्ह्यातील जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लावणार : फडणवीस

जिल्ह्यातील जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लावणार : फडणवीस
जामखेड (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्याचे धोरण महायुती सरकारचे आहे. जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागाकरिता सुरू असलेले जल सिंचणाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करूण देण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली
अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड, बाजार तळ येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महायुतीच्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार सुरेशअण्णा धस, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आदी उपस्थित होते.
उसावरील टॅक्स मोदींनी रद्द केला
कॉंग्रेसच्या काळात ऊस शेतकऱ्यांवर १० हजार कोटी रुपयांचा इनकम टॅक्स होता. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी कायदा बदलून हा टॅक्स रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याच बरोबर मोदी सरकार च्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.