“अहमदनगर”सह राज्यात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार : हवामान विभागाचा अंदाज

"अहमदनगर"सह राज्यात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार : हवामान विभागाचा अंदाज
Ahmednagar –राज्यात उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच पुढील चार दिवस हवामान खात्याने अहमदनगरसह विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघ गर्जनेसह पावसाचा हाय अलर्ट दिला आहे.1 सर्वत्र उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी तापमान 42 ते 43 डिग्रीच्याही पार गेलं आहे. मात्र पुढी काही दिवस सर्वत्र पाऊस बरसणार आहे.
आज दि ९,१०,११ आणि १२ मे रोजी या पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस पडणार!
अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, धाराशिव, लातूर नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी बीड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आज विजेच्या कडकडाटांसह मेघ गर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. तर शुक्रवारी पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, नांदेड, लातूर, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकटांसह तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.