डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी तिघे निर्दोष तर दोघांना जन्मठेप !

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी तिघे निर्दोष तर दोघांना जन्मठेप !
DR. DABHOLKAR NEWS PUNE – ड़ॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे येथील विशेष न्यायालयाने आज दि. १० मे रोजी निकाल दिला आहे. सुमारे ११ वर्षे चाललेल्या या खटल्यात पाच जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते. परंतु यापैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे तर दोन आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अंनिसचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांची २०१३ मध्ये मॉर्निंग वॉकला गेले असताना पुण्यात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातून विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. दरम्यान संजीव पुनाळेकर यांनी तपास अधिकाऱ्याविरोधात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत मात्र .. यासाठी वरिष्ठ न्यायालयात जाणार
कोर्टाच्या निकालाचं नरेद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी स्वागत केले आहे. मात्र मुक्ता दाभोलकर यांनी सुटका झालेल्यांच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांनाच शिक्षा झाली. ते बळीचा बकरा होते, परंतु ज्यांनी त्यांच्या डोक्यात भरवलं, या घटनेमागचा मास्टरमाईंड कोण?, त्यांना शोधणं गरजेचं आहे, पोलिसांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच या प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि पूर्ण न्याय मिळेपर्यंत लढा देऊ असे मुक्ता दाभोलकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात हा खटला सुरु झाला होता. डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल झाले होते. वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश होता. यापैकी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर होते.
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सुनावणी अनेक दिवसापासून सुरु होती, मात्र आता न्यायालयाने निकाल दिल्याने त्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून स्वागत करण्यात आले आहे.