१० वी, १२ वीचा निकाल याच महिन्याच्या शेवटी लागणार : गोसावी

१० वी, १२ वीचा निकाल याच महिन्याच्या शेवटी लागणार : गोसावी
10 th 12th class results 2024 – दहावी, बारावी परीक्षांचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित या निकालामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना देखील हायसे वाटणार आहे. कारण पालकांना आपल्या पाल्याचे भविष्य यावरून ठरवायचे असते म्हणजेच पुढील निर्णय घ्याचा असतो, दरम्यान याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.
दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. इयत्ता बारावीचा निकाल हा मेच्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल हा चौथ्या आठवड्यात लागेल अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच विद्यार्थ्यांची निकालाबाबतची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे.
दरम्यान दहावी बारावीचा निकाल लागल्यानंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. आपल्या पंसतीचं महाविद्यालय मिळावं यासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. याच महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे पालकांची देखील पुढील प्रवेशासाठी आधीपासूनच तयारी सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा आता सपणार आहे.