OBC आरक्षणासंदर्भात याचिकेवर 12 जुलैला सुनावणी

OBC आरक्षणासंदर्भात याचिकेवर 12 जुलैला सुनावणी
OBC Reservation – ओबीसी समाजाला राजकारणात आरक्षण हवे आहे, त्यासाठी सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मात्र पुन्हा एकदा न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. ओबीसींना राजकीय आरक्षणाचा मुदा हा विविध राजकीय पक्षांकडून पुढे आणला गेला आहे, आणि याला समर्थन देखील अप्रत्यक्षरीत्या त्यांच्याकडून आहे असेच दिसतेय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 12 जुलैला सुनावणी होणार आहे. सर्वोच न्यायालयाच्या वेळापत्रकातून ही संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र, यावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकल्यात आली आहे.
दरम्यान ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न सुरु आहेत, मात्र आता लोकसभेच्या निवडणूक सुरु आहेत. कोर्ट नेमका यावर काय निर्णय देते हे पाहावे लागेल.