“थार”ला ही गाडी देणार टक्कर; नवीन फीचर्ससह लॉन्च

"थार"ला ही गाडी देणार टक्कर; नवीन फीचर्ससह लॉन्च
JIMNI HERITAGE 2024 – सुझुकी कंपनीची जिम्नी नव्या अवतारात लॉन्च झाली आहे. ही SUV गाडी महिंद्रा महिंद्रा थारला टक्कर देणारी ठरणार आहे. सुजुकीने याच हेरिटेज एडिशन सादर केले आहे. हे एक लिमिटेड एडिशन आहे. ज्याच्या फक्त 500 यूनिट्सची विक्री केली जाणार आहे. जिम्नी हेरिटेज मॉडल एक मेड-इन-इंडिया कार आहे.
या SUV 5 डोर जिम्नी हेरिटेजच्या बॉडीवर Heritage लोगोसह स्पेशल डीकल्स पाहायला मिळतील. त्याशिवाय यूनीक कार्गो ट्रे आणि लाल मड फ्लॅप देण्यात आले आहे. जिम्नी हेरिटेज व्हाइट, शिफॉन आयवरीसह ब्लूश ब्लॅक पर्ल रूफ, जंगल ग्रीन, ब्लूश ब्लॅक पर्ल आणि ग्रेनाइट ग्रे मेटालिक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. जिम्नी हेरिटेजमध्ये 1.5 लीटर, फोर सिलेंडर पेट्रोल इंजिनची पावर मिळते. हे स्पेशल एडिशन केवळ 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन सोबत येते. जिम्नीच्या सामान्य मॉडल्समध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशन सुद्धा मिळते.
तसेच यामध्ये 9 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. त्याशिवाय एपल कारप्ले आणि एंड्रॉयड ऑटो, हिल-होल्ड कंट्रोल, हिल-डिसेंट कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, 6 एअरबॅग, LED हेडलाइट सारखे फीचर्स सुद्धा देण्यात आले आहेत. जिम्नी हेरिटेज एडिशन सर्वात आधी ऑस्ट्रेलियन्स विकत घेऊ शकतात. ऑस्ट्रेलियात ही कार सुमारे रुपये 20.43 लाखात लॉन्च करण्यात आली आहे. भारतात जिम्नीची एक्स-शोरूम किंमत 12.74 लाख रुपये आहे. ही SUV 1.5 लाख रुपयपर्यंतच्या डिस्काऊंटमध्ये विकली जात आहे. मात्र भारतात हि लॉन्च बाबत अधिकृत माहिती नाही.