मराठा समाजाची ४०० एकरावरील सभा तूर्तास रद्द !

मराठा समाजाची ४०० एकरावरील सभा तूर्तास रद्द !
बीड – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 8 जून रोजी बीडच्या नारायणगड येथे होणारी ४०० एकरावरील होणारी सभा तुर्त रद्द केली आहे. या सभेच्या आधी 4 जूनपासून मनोज जरांगे पाटील उपोषण करणार होते. परंतु आता सभा रद्द झाल्यामुळे 4 जून पूर्वी उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे, असे देखील त्यांनी सांगितले. तसेच लवकरच मराठा समाजाची बैठक घेऊन सभेची तारीख ठरवण्यात येणार आहे.
मलाही धमक्या – जरांगे पाटील
बीडमध्ये हा जो प्रकार सुरू आहे तो आता निवडणुकीनंतर होणे आपल्याला अपेक्षितच होते. मराठा मताची मुंडे याना गरज आहे, परंतु मराठा समाज बांधवांची नाही. त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे. मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ, तुला जीवे मारू, असे म्हटले जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, असे देखील म्हटले जात आहे. परंतु मुंडे बहीण-भावाने एक लक्षात घ्यावे मला बीडमध्ये येऊ दिले नाही तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे. माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.