नगर, नाशिकसह राज्यात गारपिटीचा अंदाज!

नगर, नाशिकसह राज्यात गारपिटीचा अंदाज!
Monsoon RAIN NEWS – गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी अद्यापही तापमान जास्त आहे. दरम्यान आज १६ मे रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मान्सून केरळातून सुमारे १२ मे रोजी राज्यात धडकणार आहे.
दरम्यान हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि अहमदनगर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर, बीड, कोल्हापूर, सह राज्यात इतर भागात जोराचा पाऊस बरसणार आहे.
मान्सून १२ जूनला राज्यात धडकणार!
२८ मे पर्यंत मॅान्सून केरळपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मॅान्सुनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. १२ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एखाद दोन दिवस पुढे देखील जाऊ शकतात. मान्सून 19 मे रोजी अंदमानमध्ये धडकणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला आहे.
मान्सून 19 मे च्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल. त्यानंतर मान्सून केरळमध्ये दाखल होईल आणि राज्यात धुवाधार पाऊस होईल. मागीलवर्षीपेक्षा यंदा पाऊस अधिक होणार असण्यालाच अंदाज आहे.