कृषी विभाग : राज्यात खरीप हंगामासाठी ४५.५३ लाख टन खतांचा साठा मंजूर

कृषी विभाग : राज्यात खरीप हंगामासाठी ४५.५३ लाख टन खतांचा साठा मंजूर
KRUSHI NEWS – राज्यात अवकाळी पाऊस पसडायला सुरुवात झाली आहे, तसेच मान्सून देखील २८ मे पर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून दखल शेतीची मशागतीच्या सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच आता राज्यातील कृषी विभाग देखील शेतीसाठी लागणाऱ्या खतांचा साठा अपूर्ण पडू नये यासाठी सज्ज झाला आहे, यावर्षीची कृषिविभागाकडून ४५.५३ लाख टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खतांचा साठा जाहीर केला आहे. यावेळी ४५.५३ लाख टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात २९.१९ लाख टन खतांचा साठा उपलब्ध होता तर उर्वरित खतांचा पुरवठा हा केंद्राकडून करण्यात येणार आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ४८ लाख टन खतांचा प्रस्ताव दिला होता त्यापैकी ४५.५३ लाख टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये युरिया १३.७३ लाख टन, डीएपी ५ लाख टन, पोटॅश १.३० लाख टन, संयुक्त खते (म्हणजेच NPK) १८ लाख टन, सिंगल सुपर फॉस्फेट ७.५० लाख टन, या खतांचा समावेश यामध्ये आहे.