मनुस्मृती श्लोक शालेय अभ्यासक्रमात; आराखडा जाहीर

मनुस्मृती श्लोक शालेय अभ्यासक्रमात; आराखडा जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. राज्यमंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीता तर भारतीय मुल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात उलगसूळाट चर्चा सुरु झाल्या आहेत.
‘एससीईआरटी’ने नुकताच राज्य अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध केला आहे. नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती, आहार कसा होता, गुरूशिष्य परंपरा कशी होती, याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याचा मानस शासनाचा आहे. तसेच राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागविण्यात आल्या आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले कि, याप्रकारे राज्यात काहीही होऊ देणार नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, मला याबाबत माहिती नाही मात्र यापूर्वी अभ्यासक्रमात मनाचे श्लोक शिकवले जात होते, त्यामुळे वेगळ्या चर्चा नको.
संस्था आणि जाणकारांनी भूमिका घेणे आवश्यक : पवार
सत्ताधाऱ्यांची संविधानाच्या प्रति काय मानसिकता आहे, याच्यावरून हे लक्षात येते, जर राज्य शासन असे पाऊल उचलत असेल तर प्रागतिक विचारांच्या संस्था स्वस्थ बसणार नाही, तर शैक्षणिक क्षेत्रातील जाणकरांनी यावर भूमिका घेतली पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेस (sp) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.