SBI इतर बँकांचा ग्राहकांना अ‍ॅलर्ट, SMS आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजसंदर्भात दिलीय हि सूचना

0
Sbi 1

SBI इतर बँकांचा ग्राहकांना अ‍ॅलर्ट, SMS आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजसंदर्भात दिलीय हि सूचना

BANK ALERT – एसबीआय बँके आणि इतर बँकांनी आपल्या ग्राहकांनी फसवणूकीला बळी पडू नये यासाठी अ‍ॅलर्ट जारी केला आहे. खरंतर, बँकेकडून ग्राहकांना प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी रॉयल्टी प्रोग्रामअंतर्गत एसबीआय रिवॉर्ड पॉइंट्सची सुविधा दिली जाते. या प्रत्येक पॉइंटची किंमत 25 पैसे अशी आहे. याच संदर्भात एसबीआयने ग्राहकांना महत्त्वाची सूचना देण्यासाठी पूर्वीचे ट्विटर आणि आताचे x वर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. आणि सतर्क राहण्यास सांगितले आहे.

सोशल पोस्टमधून अलर्ट
एसबीआय बँकेने म्हटले आहे कि, फसवणूकदार तुम्हाला (ग्राहकांना) APK आणि SMS सह व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एसबीआयचे रिवॉर्ड पॉइंट वापरण्यासंदर्भात एक मेसेज पाठवतात आणि विविध प्रकारे फसवणूक करतात, त्यामुळे ग्राहकांनी सावध राहावे.

व्हाट्सअँपवर लिंक पाठवली जात नाही
एसबीआयकडून कधीच लिंक किंवा एसएमएस अथवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एपीके लिंक पाठवत नाही. यामधील लिंकवर क्लिक करणे अथवा अज्ञात फाइल डाउनलोड करू नये असे आवाहन बँकेने ग्राहकांना केले आहे.

APK File म्हणजे काय त्याचा वापर कसा होतो?
एपीके फाइल एका अ‍ॅपसारखी दिसत असते. हि apk file अ‍ॅन्ड्रॉइड प्ले स्टोरमध्ये उपलब्ध नसते ती एक फाइलचे रुप आहे. ती मोबाइलमध्ये इंस्टॉल करुन वापरता येते. हॅकर्स नागरिकांची फसवणूक करण्यासाठी एपीके फाइलचा वापर करून डिवाइस अगदी सहज हॅक करू शकतात. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.

या बँकांचाही ग्राहकांना अलर्ट
आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक आणि एयू स्मॉल फायनेंस बँक, पीएनबी बँक यांनी देखील आपल्या ग्राहकांना अ‍ॅलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे कि, बँक कधीच आपल्या ग्राहकांना ईमेल आयडी, व्यक्तीगत मेसेज अथवा फोन करुन ओटीपी मागत नाही.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.