Cannes Film Festival : अनसूया सेनगुप्ताला “कान्स”मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

Cannes Film Festival : अनसूया सेनगुप्ताला "कान्स"मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
Cannes Film Festival 2024 : 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेट कार्पेटवर सध्या सेलेब्सचा धमाकेदार जलवा पाहायला मिळत आहे. अशातच कोलकाता येथे राहणारी अनसूया सेनगुप्ता हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चारस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार तिला ‘शेमलेस’ या चित्रपटासाठी देण्यात आला आहे. यामुळे कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार गौरवणारी अनसूया पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
कोण आहे अनसूया सेनगुप्ता
अनसूया सेनगुप्ताने आपल्या कामाची सुरुवात प्रोडक्शन डिझाइनर म्हणून केली होती. अनुसया हि साध्य गोव्यामध्ये राहत आहे. तिने नेटफ्लिक्सवरील शो ‘मसाबा मसाबा’ च्या सेटचे डिझाइनही केले होते. जादवपुर विद्यापीठातून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिला कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी नॉमिनेशन मिळाले तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
अनसूयाने वर्ष 2009 मध्ये प्रदर्शित झालेला अंजना दत्ता यांचा सिनेमा ‘मॅडली बंगाली‘ मधून सपोर्टिंग रोल प्ले केला होता. यानंतर वर्ष 2013 मध्ये मुंबईत आल्यानंतर काही काळ थिएटरमध्ये काम केले. यानंतर प्रोडक्शन डिझाइनरच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली होती. द वेटिंग सिटी, द गॉन गेम या चित्रपटांत देखील तिने काम केले आहे.
शेमलेसची कथा काय आहे?
‘शेमलेस’ या सिनेमाची कथा रेणुकाच्या भोवती फिरते. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या प्रकरणानंतर ते वेश्यालयापर्यंतचा प्रवास अशी एकूणच सिनेमाची कथा आहे. यामध्ये रेणुकाची प्रेमिका ओमारा शेट्टीही आहे.
2 thoughts on “Cannes Film Festival : अनसूया सेनगुप्ताला “कान्स”मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार”