Dance Deewane 4 Winner : गौरव-नितिन ठरले ‘डान्स दीवाने 4’चे विजेते

गौरव-नितिन ठरले 'डान्स दीवाने 4'चे विजेते
Dance Deewane 4 – ‘डान्स दीवाने 4’ या कार्यक्रमाने सलग तीन महिने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यावेळी टॉप 6 फायनलिस्ट जोड्यांमध्ये ट्रॉफीसाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. मात्र गौरव-नितिन यांनी बाजी मारत विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तसेच त्यांना २० लाख रुपये देण्यात येणार आहेत.
हेही वाचा : Cannes Film Festival : अनसूया सेनगुप्ताला “कान्स”मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेते सुनील शेट्टी या दोघांनी कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून काम पहिले. पाच जोड्यांना मागे टाकत गौरव शर्मा आणि नितिनने ‘डान्स दीवाने 4’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे . या महाअंतिम सोहळ्यात एकूण टॉप 6 फायनलिस्ट जोड्यांमध्ये ट्रॉफीसाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. मात्र गौरव आणि नितिन या कार्यक्रमाचे विजेते ठरले. दिल्लीत राहणारा गौरव 22 वर्षांचा आहे. तर बंगळुरूमध्ये राहणारा नितिन फक्त 19 वर्षांचा आहे. विजयानंतर दोघांना खूपच आनंद झाल्याचे सांगितले.
महाअंतिम सोहळ्यात या होत्या टॉप ६ जोड्या
गौरव आणि नितिनसह युवराज आणि युवांश, चिराश्री आणि चैनवीर, श्रीरंग आणि वर्षा, दिव्यांश आणि हर्ष, काशवी आणि तरनजोत हे देखील या कार्यक्रमात महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचले होते. पण शेवटी गौरव आणि नितिन यांनी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
1 thought on “Dance Deewane 4 Winner : गौरव-नितिन ठरले ‘डान्स दीवाने 4’चे विजेते”