Cannes 2024:’ऑल वी इमेजिन अॅज लाइट’ सिनेमाला “ग्रँड प्रिक्स” पुरस्कार

Cannes 2024:'ऑल वी इमेजिन अॅज लाइट' सिनेमाला "ग्रँड प्रिक्स" पुरस्कार
All We Imagine As light – कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ या भारतीय सिनेमला ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार मिळाला आहे. भारतीय कलाविश्वातील शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. पायल कपाडिया यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पाल्मे डी’ओर पुरस्कारानंतर ‘ग्रँड प्रिक्स’ हा फिल्म फेस्टिव्हलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. या सिनेमामध्ये कनी कुश्रुती, दिव्या प्रभा, छाया कदम आणि हृधू हारून यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
३० वर्षानंतर हा इतिहास
पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ सिनेमाचे गुरुवारी दि 23 रोजी रात्री स्क्रीनिंग करण्यात आले. त्यावेळेस उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून सिनेमासह कलाकारांवरही कौतुकाचा वर्षाव केला. तब्बल आठ मिनिटे टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. तर सिनेमाच्या टीमला स्टँडिंग ओव्हेशनही मिळाले. एकूणच पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटाने आपल्या वर्ल्ड प्रीमियरमध्ये मोठा धमाका केला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील समीक्षकांचीही वाहवाई लुटली. ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ हा सिनेमा फेस्टिव्हलच्या मुख्य स्पर्धेमध्ये पात्र ठरणारा 30 वर्षांतील पहिला भारतीय चित्रपट आहे.
हेही वाचा : Dance Deewane 4 Winner : गौरव-नितिन ठरले ‘डान्स दीवाने 4’चे विजेते
छाया कदम याच कौतुक
मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांची ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट” या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. त्यांनी तिन्ही दिवस कान्स सोहळ्यात आपलं मराठमोळं पण जपत खास लूक केले होते. त्यांच्या या लुक्सची देखील चर्चा होतेय. विशेषत: त्यांचा हा इंडोवेस्टर्न लूक आणि त्यावर त्यांनी आईची घातलेली नथ यांची चर्चा होत आहे. चित्रपटाला पुरासहकार मिळाल्याने छाया कदम याच्यावर मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटातील कलाकारांकडून खास कुतुकांचा वर्षाव होत आहे.