post office scheme : महिलांसाठी पोस्टाची “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना” छोट्या गुंतवणुकीतून मिळणार लाखो रुपये..

post office scheme : महिलांसाठी पोस्टाची “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना” छोट्या गुंतवणुकीतून मिळणार लाखो रुपये..
post office scheme : केंद्र सरकारमहिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविधरित्या प्रयत्न करत आहे. मुली/महिलांसाठी बचत करता यावी यासाठी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांमध्ये बचत करण्याची सवय लागणार आहे. हि योजना खूप महत्त्वाची आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना – 2023 ही भारत सरकारची भारतीय मुली / महिलांसाठी एक लहान बचत योजना आहे. भारतीय महिलांमध्ये बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देणे हा योजने उद्देश आहे. हि योजना पोस्ट ऑफिसमध्ये २०२३ रोजी पासून सुरु करण्यात आली आहे.
या योजनेसाठी अर्ज करणारी मुलगी किवा महिला ही भारताची रहिवासी असायला हवी. यासाठी वयाची कुठलीही अट नाही. अल्पवयीन मुलीच्या नावाने नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक देखील यासाठीचे खाते उघडू शकतो. या योजनेअंतर्गत संयुक्त खाते उघडता येत नाही. वैयक्तिकरित्याच खाते उघडावे लागते.
हेही वाचा : राहुरी : बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय मुलीचा मृत्यू
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये.
या योजनेच्या अंतर्गत कमीत कमी 1000 तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या योजनेअंतर्गत दुसरे खाते उघडण्यासाठी, विद्यमान खाते उघडण्याच्या तारखेपासून तीन महिन्यांचे अंतर असावे. या योजनेत 7.5 टक्के प्रतिवर्ष व्याज मिळते. हे व्याज त्रैमासिक चक्रवाढ करून खात्यात जमा केले जाते. या योजनेतील ठेव रक्कम ठेवीच्या तारखेपासून 2 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मॅच्यूर होते. तर जमा केल्यावर एका वर्षानंतर उरलेली रकमेच्या 40 टक्के रक्कम काढता येते. ही सुविधा मॅच्यूरिटीच्या आधी फक्त एकदा उपलब्ध आहे.
येथे देखील योजनेचे खाते उघडले जावू शकते
सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि पात्र खाजगी क्षेत्रातील बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 ची अंमलबजावणी आणि कार्यान्वित करण्याची परवानगी दिली आहे. तसेच मुली/महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आता पोस्ट ऑफिस आणि पात्र शेड्यूल्ड बँकांमध्ये देखील कार्यान्वयित करण्यात आली आहे. येथे देखील मुली आणि महिलांना आपले या योजनेसाठीचे खाते उघडले जावू शकते.
2 thoughts on “post office scheme : महिलांसाठी पोस्टाची “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना” छोट्या गुंतवणुकीतून मिळणार लाखो रुपये..”