राहुरी : बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय मुलीचा मृत्यू

राहुरी : बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय मुलीचा मृत्यू
अहमदनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील वरवंडी येथे बिबट्याच्या हल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेदिका श्रीकांत ढगे (वय ४) असे मृत्यू झलेल्या मुलीचे नाव आहे. सकाळी घराच्या अंगणामध्ये खेळत असताना अचानक शेतातील गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने वेदिका हिच्यावर झडप घातली त्यामध्ये ती जखमी झाली. नगर येथे पुढील उचारासाठी घेऊन जात असताना उचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील माजी सरपंच श्रीकांत ढगे यांची मुलगी वेदिका हि सकाळी घराच्या अंगणामध्ये खेळात असताना सुमारे ८ वाजेच्या दरम्यान शेजारीच गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. त्या हल्यात ती गंभीर जखमी झाली. तिला पुढील उपचारासाठी नगर येथे नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच अगोदरच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक आणि वन विभागाचे वन क्षेत्रपाल युवराज पाचारणे, वनरक्षक सतीश जाधव आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले . तसेच पुढील कार्यवाही पार पडली. या घटनेने राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच राहुरी, संगमनेर, राहता, शिर्डी आदी ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत, तिथे बिबट्याना पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली जात आहे.
2 thoughts on “राहुरी : बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय मुलीचा मृत्यू”