हवामान विभागाची महत्वाची अपडेट ! राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट

हवामान विभागाची महत्वाची अपडेट ! राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट
अहमदनगर (प्रतिनिधी) – मान्सून अंदमानमध्ये येऊन धडकलेला असताना आणि मान्सूनकडे शेतकरी डोळे लावून बसलेला असताना, आता मात्र राज्यातील काही भागात उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर काही भागात हलकासा पाऊसाची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर ट्विट केले आहे.
अहमदनगरमध्ये सुमारे ४० अंश सेल्सिअस तापमान गेल्या दोन दिवसांपासून राहत आहे, तसेच पुढील दोन दिवस देखील असेच तापमान राहणार आहे, मात्र त्यानंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच बीड, नाशिक, धाराशिव, पुणे आदी ठिकाणी अशाचप्रकारची स्थिती आहे. राज्यात सर्वाधिक जळगाव येथे ४५.३°C कमाल तापमानाची नोंद झाली आहे तर सातारा येथे २२.५°C हे सर्वात कमी किमान तापमानाही नोंद झाली आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे कि, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट वातावरणाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्याची राजधानी मुंबई आणि उपनगरांत उष्ण आणि दमट वातावरण राहणार आहे.
…तर येथे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्या वाऱ्यासह हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विघ्गाने म्हटले आहे.