डुप्लिकेट अमिताभ बच्चन यांचे निधन !

डुप्लिकेट अमिताभ बच्चन यांचे निधन !
FIROJ KHAN DEATH – अभिनेते फिरोज खान यांचे आज दि. २३ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने बदायू येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी “भाबीजी घरपर है” या मालिकेत काम केले होते. ते हेबेहूब अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसत होते. त्यांनी अभिनयासोबतच बॅचचं यांची मिमिक्री देखील करत होते.
अभिनेते अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करण्यासाठी त्यांची खास ओळख होती. देशातच नाही तर विदेशातचही त्यांनी बिग बींची मिमिक्री करून लाखोंची मनं जिंकली होती. फिरोज खान यांना अमिताभ बच्चन यांचा ड्युप्लिकेट म्हणून देखील ओळखलं जात होते. इतकंच नाही तर त्यांनी “भाबीजी घर पर हैं, ‘जीजा जी छत पर हैं’, ‘साहब बीबी और बॉस’, ‘हप्पू की उल्टन पल्टन’ आणि ‘शक्तिमान’ सारख्या मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे.