शेअर मार्केट : गदेवाडीत २० कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेअर मार्केट : गदेवाडीत २० कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल करण्याची मागणी
शेवगांव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गदेवाडी येथील शेतकरी आणि व्यापारी यांनी शेअरमार्केट आणि इतर मार्गाने १२ ते १५ टक्के अधिक परतावा देण्याचे अमिश दाखवून सुमारे २० कोटी रुपयांची फसवणूक केले असल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती आता फरार झाला असून पिडीतांनी पोलीस ठाणे गाठले असून गुन्हा दाखल करून न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गेल्या अनेक महिन्यनपासून शेवगाव तालुक्यात शेअरमार्केटच्या माध्यमातून अधिक परतावा देण्याच्या नावाखाली सरळ लूट सुरु आहे. मात्र मागील काही दिवसात अनेकजण कोट्यवधी रुपये घेऊन पसार झाले आहेत. त्याचप्रकारे गदेवाडी आणि परिसरातीलशेतकरी आणि व्यावसायिक याना लाखो रुपयांचा गंडा घालून अक्षय इंगळे हा पसार झाला आहे.
शेअर्मार्केटमधून अधिक परतावा देण्याचे त्याने अमिश दाखवले होते. तसेच याला या कामामध्ये अनेकजणांनी मदत केली होती. काही काळ सुमारे १२ ते १५ टक्के परतावा काहींना दिला मात्र तो देण्याचे बंद झाले आणि तो फरार झाला. आता गुंतवणूकदार पोलीस ठाण्यात जाऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी ऍड. माउली धनावडे,संजय जोशी, रामेश्वर मडके, श्रीकांत जोशी, राजू जोशी, श्रीराम मडके, कैलास गुजर, नवनाथ माली, दत्तू नाचण, ज्ञानदेव नाचण, गणेश मडके, शेख हुसेन, पंडित मडके, आकाश हाडे, जनार्दन वंजारी, गणेश तुपे, सुभाष माळी, प्रशांत शिंदे आणि उपस्थित होते.
हेही वाचा :राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
हे वकील करणार मदत
शेअर मार्केटच्या नावाखाली ज्यांच्यासोबत अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार घडले आहेत अशांच्या सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे ऍड. आकाश लाव्हाट, ऍड. अतुल लबडे, ऍड. सुहास चव्हाण, ऍड. विजय कराड यांनी सांगितले. तसेच यापुढेही अशाप्रकारे घटना घडल्यास आणि सहकार्य लागल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे त्यांनी म्हटले आहे.