राज्यात शिक्षक भरतीला ब्रेक !

राज्यात शिक्षक भरतीला ब्रेक !
Teacher Recruitment news – राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरु आहे मात्र, सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र शिक्षण विभागाच्या विनंतीवरून निवडणूक आयोगाने विशेष बाब म्हणून भरतीसाठी सूट दिली होती. त्यानंतर भारती प्रक्रिया हि सुरु झाली होती मात्र असे असताना विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण आणि नाशिक विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या विभागात 24 मे पासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात जशी सवलत मिळाली होती तशीच सवलत विधान परिषद निवडणुकीच्या काळात मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी म्हटले आहे. त्यासाठी शिक्षक संघटना आणि संबंधित यंत्रणेतील बरिष्ठ यांनी याबाबत मागणी केल्याचे बोलले जात आहे .
दरम्यान यामुळे आता शिक्षक भरती प्रक्रीयेतील आचारसंहितेचा अडथळा दूर होईल कि नाही हे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यांवर ठरणार आहे. मात्र या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.