बीड : वंजारी समाजाचा अजब ठराव; मराठा समाजाच्या दुकानांतून खरेदी न करण्याचा निर्णय, समाजातील वातावरण पेटणार

बीड : वंजारी समाजाचा अजब ठराव; मराठा समाजाच्या दुकानांतून खरेदी न करण्याचा निर्णय, समाजातील वातावरण पेटणार
BeedNews – बीड जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण हे जातीय वादावर जाताना यंदाच्या निवडणुकीत अनुभवायला सर्वाना मिळाले, त्यानंतर मात्र वंजारी आणि मराठा हा वाद होणार नाही कारण “झाले इलेक्शन जप रिलेशन” या म्हणीप्रमाणे सार्वजन गुण्यागोविंदाने राहतील असे वाटत असतानाच बीड जिल्ह्यात एका गावात दोन समाजातील गटांत दगडफेक झाली आणि आता जिल्ह्यातील मुढेवाडी या गावात वंजारी समाजाकडून मराठा समाजावर बहिष्कार घालण्यात आला आहे. याबाबतचा एक विडीओ सोसिअल मिडीयावर वायरल झाला आहे. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण केला जात असल्याचे म्हटले जात आहे.
जिल्ह्यातील वंजारी समाजबहुल एका गावाने मराठा समाजाच्या दुकानांतून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा ठराव केला आहे . मात्र, या ठरावामुळे बीड जिल्ह्यात जातीय संघर्ष वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, नेमक कशामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला? नेमकं कोण विष कालवत आहे? या अुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या जातीय संघर्षाचे परिणाम बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाणवन्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, १७ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता वंजारी समाजाची मुंढेवाडीमध्ये गावातील मंदिराच्या पारावर बैठक झाली. या बैठकीत वंजारी समाजातील लोकांनी अजब ठराव केला, ज्यात मराठा समाजाच्या दुकानावर, टपरीवर, जायचे नाही, मराठा समाजाच्या किर्तनकाराला किर्तनाला बोलवायचे नाही, मराठा समाजाच्या बियर बारवर जायचे नाही, मराठा समाजाच्या चहाच्या हॉटेलवर जायचे नाही, जो कोणी हा नियम मोडेल, त्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे . मात्र, या ठरावामुळे वंजारी आणि मराठा समाजात वाद पेटण्याची शक्यता आहे. बीडमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बीडचे प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करत आहे.
या प्रकारे निर्णय नको : जरांगे पाटील
या पद्धतीने काहीही व्हायला नको आहे, कारण शेवटी आपण गाव- खेड्यात एकत्र राहतो. आम्ही कधीच जातीवाद केला नाही. आम्ही आधी कोणाला बोललोच नाही. गैरसमज झाला असेल तर समाजाने तो संवादातून सोडवावा. तुम्ही गोरगरीब मराठ्यांशी असे वागणार? सत्तेत आल्यानंतर काय होईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनी समाजातील कोणीही याप्रकारे निर्णय घेवू नये असे अवाहन केले आहे. तसेच याप्रकारे कोणती शक्ती काम करून घेत आहे त्याना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
नेत्यांची भूमिका महत्वाची
बीड जिल्ह्यासह राज्यात ओबीसी आणि मराठा वाद हा मराठा आंदोलनावेळी आणि दरम्यान वेळोवेळी विविध पक्षांच्या, संघटनांच्या नेत्यांनी आपल्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी समाजा – समाजात संघर्ष उभा कसा राहील त्यासाठीच आपला काळ खर्ची केला, त्याऐवजी सर्व जमाजातील नेत्यांनी आणि सरकारने प्रशासनाने सामोपचाराने घेतले तर सर्व समाज बांधव एकत्र राहतील आणि असे बहिस्कारासारखे प्रकार घडणार नाहीत.
दोन्ही मुंडे, जरांगे पाटील, भुजबळ आणि सरकार यांची भूमिका काय ?
माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकज मुंडे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, अन्न व प्रशासन मंत्री छगन भुजबळ आणि मराठा नेते आणि आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका झहीर करून समाजात अशाप्रकारे तेढ निर्माण होणार नाही यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच सरकारने देखील समाजात अशाप्रकारे कोनीही विष पेरण्याचे किवा कळवण्याचे काम करू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, नाहीतर राज्यात अराजकता पसरायला वेळ लागणार नाही. सर्वच समाजाने आनंदी आणि एकमेकांच्या सोबत राहायला हवे. यासाठी आपापली भूमिका समाजासमोर स्पष्टपणे मांडली गेली पाहिजे.