रणजित सिंह हत्याकांड प्रकरणात राम रहीम यांची निर्दोष मुक्तता

रणजित सिंह हत्याकांड प्रकरणात राम रहीम यांची निर्दोष मुक्तता
RAM RAHIM NEWS – बहुचर्चित रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीम यांना दिलासा देत निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात सीबीआयच्या न्यायालयाने राम रहीम यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात राम रहीम यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
रणजीत सिंह सिरसा हे डेरेचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. एका संशयातून २२ वर्षांपूर्वी रणजीत सिंह यांची हत्या करण्यात आली होती. रणजीत सिंह हरियाणातील कुरुक्षेत्र येथील राहणारे होते. १० जुलै २००२ मध्ये गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. एका अज्ञान साध्वीने तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना एक चिठ्ठी लिहिली होती. यात त्यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणात राम रहीम याचा तपास करण्याची मागणी केली होती. रणजीत सिंह यांनीच लैंगिक अत्याचाराची चिठ्ठी आपल्या बहिणीकडून लिहून घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
ही अनामिक चिठ्ठी सिरसाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी आपले सायंकाळी प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रातून ‘संपूर्ण सत्य’ समोर आणले होते. त्यानंतर २४ ऑक्टोबर २००२ मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. २१ नोव्हेंबर २००२ मध्ये दिल्लीतील अपोलो रुग्णालयात रामचंद्र यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान याचा तपास २००३ मध्ये CBI कडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर राम रहीम यांच्या वाहन चालक याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२०२१ मध्ये सीबीआयच्या न्यायालयाने गुरमीत राम रहीमसह पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. साध्वी लैंगिक अत्याचार प्रकरणात राम रहीम सिंह यांना 20 वर्षांची शिक्षा सुनावली. सध्या राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहेत.