Cabinet Expansion 2024 : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?

Cabinet Expansion 2024 : राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
CABINET EXPANTION NEWS- लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असुन त्यानंतर राज्यात मोठे फेरबदल ण्याची शक्यता आहे. लवकरच राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे खात्रीलायक माहिती समोर येतेय. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, तसेच काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, त्यांची महामंडळावर वर्णी लावली जाणार आहे. त्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांना या विस्तारात तरी मंत्रिपद मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नवीन चेहऱ्यानं संधी, पालकमंत्रिपदांची आदलाबदल
दरम्यान या मंत्रिमंडळ विस्तारावेळी काही मंत्र्यांचे खाते बदल आणि पालकमंत्रीपदांचीही अदलाबदल
केली जाणार आहे. तसेच दोन किंवा त्यापेक्षा अधिक खाती असणाऱ्या मंत्र्यांची खाती काढून नवीन मंत्र्यांना देण्यात येणार आहे. यावेळी विधान सभेसाठी म्हणून अनेक समीकरणे जुळवून नवीन चेहऱ्यानं संधी मिळणार असेच चित्र सध्या तरी आहे. तसेच ज्या महामंडळावर अद्याप कोणतीही नियुक्ती करण्यात आलेली नाही त्यावरही आता नियुक्ती केली जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात प्राथमिक चर्चाही झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवडही प्रलंबित असून त्याचाही निर्णय घेतला जाणार असल्याचे समजतेय
READ THIS : GREEN PEAS : आरोग्यासाठी फायदेशीर हिरवे वाटणे…
राज्यात रिक्त असलेली महामंडळ
- सिडको
- महात्मा फुले महामंडळ
- आण्णाभाऊ साठे महामंडळ
- म्हाडा
- अपंग कल्याण
- चर्मोद्योग विकास महामंडळा
- महाराष्ट्र औद्योगीकरण विकास महामंडळ
- महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळ
- महारष्ट्र राज्य वखार महामंडळ
- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ
- महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
- महराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
- महिला अर्थिक विकास महामंडळ