साईंच्या कृपेने “विजय” निश्चित : पंकजा मुंडे

साईंच्या कृपेने "विजय" निश्चित : पंकजा मुंडे
अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे, मात्र त्याअगोदरच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिर्डी येथे येत साईंचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांच्या आई होत्या. साईंच्या कृपेने मी खासदार होईलच परंतु डॉ. सुजय विखे पाटील हे देखील खासदार होतील असा विश्वास व्यक्त करत विजयाची हमीच यांनी यावेळी बोलताना दिली.
दरम्यान आज दि. ३१ मे रोजी पंकजा मुंडे आणि नितेश राणे कुटुंबीयांची शिर्डीतील देवस्थानाच्या ठिकाणी भेट झाली. त्यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांची आस्थेने चौकशी केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुंडे यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील याच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील उपस्थित होत्या.
श्रद्धा आणि सबुरीचे फळ मिळणार
मुंडे म्हणाल्या की, साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी या संदेशाचे पालन केलं तर जीवनात अडचणी येत नाहीत. आज मी आई बरोबर या ठिकाणी आले. 2014 नंतर प्रथमच आईच्या आग्रहामुळे देवदर्शन करण्यासाठी बाहेर पडले आहे. गेली सत्तर दिवस प्रचारात गेले आहेत. कोणतही काम हाती घेतले तर ते शंभर टक्के करावेच लागते. साईंच्या कृपेने निकाल देखील सकारात्मक लागेल असे मुने यांनी यावेळी म्हटले.