Malaika-arjun breakup : मलायका – अर्जुनचं ब्रेकअप, पोस्ट चर्चेत !

Malaika-arjun breakup : मलायका – अर्जुनचं ब्रेकअप, पोस्ट चर्चेत !
MALAIKA ARORA BREAKUP NEWS – अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यात ब्रेकअप झाला आहे. त्यामुळे हि जोडी चर्चेत आली आहे. फिल्म इंडस्ट्रीसह सर्वत्र यांच्या ब्रेकअपचीच चर्चा सुरु आहे. याबाबत दोघांनी देखील अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र मलायका हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिची हि पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा हिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक “क्रिप्टिक पोस्ट” शेअर करत ‘जमीनीवरील सर्वांत मोठे धन ती लोकं आहेत, जे आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. आपल्यासोबत कायम उभे असतात. अशा लोकांना विकतही घेता येत नाही आणि त्यांची जागा देखील कोणी घेऊ शकत नाही, आपल्या सर्वांकडे अशी लोकं फार कमी असतात’. असे तिने या आपल्या पोस्टवर म्हटले आहे. हीच ती पोस्ट आहे जी सध्या खूप व्हायरल होत आहे. हि पोस्ट अर्जुन कपूर याला उद्देशून लिहिली गेली असावी असा अंदाज लावला जात आहे. मात्र या दोघांपैकी कोणीच अधिकृतरीत्या याबाबत वक्तव्य केलेले नाही त्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाले कि नाही हे स्पष्ट होत नाही.
दरम्यान जानेवारी २०२४ पासूनच दोघे विभक्त होणार आहेत अश्या चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. मात्र सूत्रांच्या माहिती नुसार त्यांनी त्यावेळी ब्रेकअप न करता नात्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता असे सांगितले जातेय. मात्र आता या पोस्टमुले ब्रेकअप होणार असल्याचे म्हटले जात आहे.
1 thought on “Malaika-arjun breakup : मलायका – अर्जुनचं ब्रेकअप, पोस्ट चर्चेत !”