Ajit Pawar : जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा होणार चौकशी

शिखर बँक घोटाळा : अजित पवारच्या अडचणीत वाढ, अण्णा हजारे पुन्हा पिटिशन दाखल करणार
Ajit Pawar – पुणे – लोकसभा निवडणुतिचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘मला कोणीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत नाही’, आपल्यासारखे पाठी असल्याने सर्व सुरळीत होईल, ते त्यांचे काम करत आहेत, असे म्हटले. अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.
दरम्यान पुण्यात पवार यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते. एसीबीने जरंडेश्वर कारखाना प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली असेल तर तुम्हाला काय त्रास होत आहे? ज्या कोणाविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर त्याची चौकशी करणे, हे संबंधित यंत्रणेचे कामच आहे. एखाद्या प्रकरणात एका तपास यंत्रणेने चौकशी बंद केली, मात्र पुन्हा जर दुसऱ्या एखाद्या यंत्रणेला त्या प्रकरणाची चौकशी करावी, असे वाटत असेल तर त्यांनी ते करण्यात गैर काय आहे? तुमची, आमची किंवा आणखी कोणाचीही चौकशी करायची असेल तर तपास यंत्रणांना ती चौकशी करु शकतात, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.
तसेच लोकसभा निकाल लागल्यानंतर राज्यात उलथापालथ होणार असे म्हटले जात आहे. त्यातच आता विविध मुद्यावर तीनही पक्षात एकमत असल्याचे दिसत नाही, त्यामुळे काही अदृश्य शक्ती हि चौकशी सुरु करण्यामागे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
1 thought on “Ajit Pawar : जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा होणार चौकशी”