Salman Khan : सलमान खानवर हल्ल्याचा कट; चौघांना अटक

Salman Khan : सलमान खानवर हल्ल्याचा कट; चौघांना अटक
Salman Khan – अभिनेता सलमान खान याच्यावर मागील काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला होता, आत पुन्हा एकदा सलमान खान याच्यावर हल्ला करण्याचा आणखी एक कट उघड केल्याचा दावा नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. घरावर केलेल्या हल्यात सलमान आणि कुटुंबीय बचावले होते. परंतु आता अशापद्धतीने रेकी केली जात असल्याने काहीसे भीतीचे वातावरण असल्याचे म्हटले जातेय. मात्र पोलिसांनी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.
Read This : Malaika-arjun breakup : मलायका – अर्जुनचं ब्रेकअप, पोस्ट चर्चेत !
दरम्यान लॉरेन्स बिश्नोई टोळीतील 16-17 जणांनी फेब्रुवारी महिन्यात पनवेलमध्ये याबाबत रेकीदेखिल केली होती, तसेच आता सलमान खान पनवेलला आपल्या फार्म हाऊसवर जात असताना त्याच्यावर हल्ला करण्याचा यावेळी कट रचण्यात आला होता, असे नवी मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात चार जणांना अटक करण्यात आले आहे. सलमानच्या वांद्रे येथील घरावर मागील महिन्यात गोळीबार करण्यात आला होता, त्यामध्ये चौकशीतून दोन जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान यातील १ जाणणे कारागृहात आत्महत्या केली होती. मृत्यू झाला होता.
सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानावर गेल्या महिन्यात गोळीबार झाला होता.त्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्या दोघांपैकी एकानं कारागृहात आत्महत्या केली होती.
चित्रपट कलाकारांवर हल्ले करून खंडणी वसुली सुरू करण्याचा लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रयत्न असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले आहे.त्यामुळे कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.