Pragyandand : भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने रचला इतिहास

भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने रचला इतिहास
Pragyanand : भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ टुर्नामेंटमध्ये जगभरातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याच्या विरोधात क्लासिक बुद्धिबळ लढतीत विजय मिळवला आहे.
दरम्यान त्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू फाबियानो कारूआना यालाही क्लासिकल बुद्धिबळाच्या पाचव्या टप्प्यात पराभूत केले आहे. प्रज्ञानंद याने क्लासिक बुद्धिबळात या दोघांना पराभूत करून इतिहास रचला आहे. कारण कि, त्यांना पहिल्यांदाच कोणीतरी हरवले आहे. या त्याच्या विजयासाठी अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत प्रज्ञानंद याला शुभेच्छा दिल्या आहेत.