Breaking News : निलेश लंके यांच्या कार्यालयावर बुलडोझर; कारवाई सूडबुद्धीने नाही : विखे पाटील

निलेश लंके यांच्या कार्यालयावर बुलडोझर; कारवाई सूडबुद्धीने नाही : विखे पाटील
पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील सुपा शहरासह, औद्योगिक वसाहत व नगर-पुणे महामार्गावर सुपा टोलनाका भागातील अतिक्रमणे शनिवार दि १ जून रोजी पाडण्यात आली आहेत. यामध्ये माजी आ. नीलेश लंके यांच्या कार्यालयाचा देखील समावेश आहे.
माजी आ. नीलेश लंके सुपे येथील कार्यालयावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. जेसीबीच्या सहाय्याने त्यांचे कार्यालय जमीनदोस्त केले. यावेळी अतिक्रमण पथकाने पारनेर रोडची अतिक्रमणे काढली. त्याचबरोबर सुपा टोलनाका परिसरातील अनेक अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. दि १ जून रोजी काढलेल्या अतिक्रमणात अनेक पक्क्या बांधकामाचा समावेश आहे. या अतिक्रमणांमुळे अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता, तसेच अनेक घटना येथे घडत होत्या. अतिक्रमण काढण्यासंदर्भात अनेक दिवसापासून मागणी नागरिकांतून केली जात होती, असे म्हटले जात आहे.
दरम्यान उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, डीवायएसपी संपत भोसले यांच्यासह अ.नेक बड्या अधिकार्यांच्या उपस्थितीत ही अतिक्रमणे काढण्यात आली. पोलिस निरिक्षक अरुण अव्हाड यांनी याकामी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
Read This : J.P. NADDA : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार? राज्यातही फेरबदल होणार !
या विभागांची सयुंक्त कारवाई
सार्वजनिक बांधकाम विभाग, महसुल विभाग, औद्योगिक वसाहत अधिकारी व पोलिस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत सुपा येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रणे काढली. त्यामुळे अनेक रस्त्यानी आणि घरांनी, नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण काढत्या वेळी शिघ्र कृती दलाची तुकडी देखील तैनात करण्यात आली होती.
सूडबुद्धीने कारवाई : लंके
सुपा येथे गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणच्या नावाखाली सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरु असून, अतिक्रमण हटाव मोहीम ही सूडबुद्धीने केली जात आहे असा आरोप माजी आमदार निलेश लंके यांनी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर करत टीका केली होती.
Read This : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे, पी.सी.चाको यांची निवड
सुप्यातील अतिक्रमण हटाव मोहीम सूडबुद्धीने नाही : विखे पाटील
अतिक्रमण हटाव हि मोहीम किंवा ही कारवाई केवळ सुपा येथेच नाही तर संपूर्ण राज्यात सुरु आहे. जिथे अतिक्रमणामुळे जनतेची गैरसोय होती तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. त्याबाबत वेगळं वाटण्याची गरज नाही. मात्र, ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोत्री लोकांवर सुरु केला आहे. त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे, अतिक्रमणाची हि कारवाई सूडब्द्धीने केलेली नाही, अशा शेलक्या शब्दांत महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांचे नाव न घेता केली.