J.P. NADDA : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार? राज्यातही फेरबदल होणार !

J.P. NADDA : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार? राज्यातही फेरबदल होणार !
BJP JP NADDA – लोकसभेचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. निकालाच्या दोनच दिवसांनी भाजपमध्येही मोठे फेरबदल होणार आहेत. भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाची तरी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे फेरबदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ ६ जून रोजी संपणार आहे. यानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. नड्डा यांच्यानंतर भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? याची चर्चा आता सर्वत्र होत आहे. भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळाल्यानंतर महाराष्ट्र संघटनेतही बदल होतील. राज्यात देखील दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणुकीचा बिगुल बजणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात होणारे बदलही महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यात देखल कोण प्रदेशाध्यक्ष होणार कि, चंद्रशेखर बावनकुळे हेच प्रदेशाध्यक्ष राहतील हे ४ जून रोजी लोकसभा निकालानंतर स्पष्ट होईल. तसेच जेपी नड्डा यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्यांनी २०२० रोजी आपला अध्यक्षपदाचा कारभार हाती घेऊन पक्षासाठी अविरत काम करत आहेत.
या पाच नावांची चर्चा
शिवराज सिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, ओम माथूर आणि वसुंधरा राजे यांच्या नावांची चर्चा आहे. यात शिवराज सिंह चौहान यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
1 thought on “J.P. NADDA : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार? राज्यातही फेरबदल होणार !”