Gautam Adani : गौतम अडाणी ब्लूमबर्गच्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani : गौतम अडाणी ब्लूमबर्गच्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Gautam Adani – भारतातील अब्जाधीश गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीमध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव कोरले आहे. उद्योजक अडानी हे सध्या १११ अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह निर्देशांकात ११ व्या क्रमांकावर तर रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना त्यांनी १०९ अब्ज डॉलर्सला मागे टाकले आहे. त्यामुळे अंबानी हे अडाणी याच्या मागे गेले आहेत.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बर्नार्ड अर्नॉल्ट सध्या २०७ अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या खालोखाल इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती २०३ अब्ज डॉलर्स आणि जेफ बेझोस यांची १९९ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
दरम्यान अडानी ग्रुप समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. त्यामुळे अदानी समूहाच्या समभागांसाठी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल १.२३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, ज्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान अडानी ग्रुपचे एकूण बाजार भांडवल हे १९.९४ लाख कोटी रुपये झाले. ट्रेडिंग सत्राच्या अखेरीस, बाजार भांडवल १७. ५४ लाख कोटी रुपयांवर वर स्थिरावले होते, ज्यामुळे कंपनीच्या मूल्यामध्ये ८४,०६४ कोटींची वाढ झाली. या सर्व सकारात्मक योजनांमुळे अडाणी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पुढे आले आहेत.