19/02/2026

पंतप्रधानांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास ; थोरातांनी दुसऱ्याची तळी उचलण्यातच धन्यता मानली : विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil

जिल्ह्यातील टंचाईबाबत प्रशासनाला सूचना अचारसंहीता अद्याप शिथिल झाली नसली तरी टंचाईच्या बाबतीत सर्व सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.पाणी आणि चारा यांची टंचाई कुठेही भेडसावणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या निर्धार देशातील जनतेने केला होता. मतदानानंतर आलेल्या कल चाचण्यातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच अहील्यानगर मतदार संघातही जनतेन विकासालाच प्राधान्य दिले.
त्यामुळे महायुतीच्याच उमेदवाराचा विजय होणार असल्याचे मत महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या दाव्याची खिल्ली उडवताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, ज्यांना काॅग्रेससाठी जिल्ह्यात एकही जागा आणता आली नाही. त्यांनी दुसऱ्याची तळी उचलण्यात त्यांनी धन्यता मानली. आता स्वताच्या अस्तित्वाची चिंता करा, असा खोचक सल्ला मंत्री विखे पाटील यांनी थोरात याना दिला.

राजकीय सूडबुद्धीने कारवाई नाही
सुपा येथील अतिक्रमण काढण्याच्या मोहीमेत कोणतीही राजकीय सूडबुध्दी नाही. प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणची अतिक्रमण सगळीकडेच काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे गुन्हेगारीला पाठबळ मिळत होते. पण ज्यांनी आशा भाडोत्री लोकांमार्फत आपला धंदा सुरू ठेवला आहे, त्यांना वाईट वाटणे सहाजिक असल्याचा टोला त्यांनी आरोप करणार्यांना लगावला.

जिल्ह्यातील टंचाईबाबत प्रशासनाला सूचना
अचारसंहीता अद्याप शिथिल झाली नसली तरी टंचाईच्या बाबतीत सर्व सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.पाणी आणि चारा यांची टंचाई कुठेही भेडसावणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed