TOLL TAX : देशातील टोल टॅक्समध्ये दरवाढ !

देशातील टोल टॅक्समध्ये दरवाढ !
Toll Plaza – लोकसभा निवडणूक संपताच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने देशभरात टोल टॅक्स वाढवला आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवास आता महागला आहे. आज सोमवार दि. ३ जून पासून हि दरवाढ करण्यात अली आहे. देशातील अनेक टोल प्लाझांवर सुमारे 3 ते 5 टक्के टॅक्स द्यावा लागेल. त्यामुळे जनसामान्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, म्हणजेच खिशावर भार पडणार आहे. त्यातच आता महागाई आणि हे दरवाढ, सर्व नियोजन कोलमडणार आहे असेच चित्र सध्या आहे. अगोदरच टोल दर अधिक आहे, मात्र तरी देखोल हि वाढ करण्यात आल्याने वाहन धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
देशातील महामार्गावरील प्रवास महागणार असून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने टोल टॅक्समध्ये वाढ केली आहे. यामुळे वाहनचालकांना आज दि. ३ जून पासून टोल प्लाझांवर 3 ते 5 टक्के जास्त टोल टॅक्स भरावा लागणार आहे. 1 एप्रिलपासून खरेतर हि वाढ होणार होती मात्र निवडणुकांमुळे हि वाढ पुढे ढकलण्यात आली होती, असे म्हटले जाते. देशातील विविध ठिकाणच्या सुमारे 1,100 टोल प्लाझांवरील टोल दरात 3 ते 5 टक्के वाढ होणार आहे.

तसेच टोलनाक्याच्या २० किलोमीटरच्या परिसरात राहाणाऱ्या लोकांचे मासिक पासचे दरही वाढवण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. यावर आता विरोधक काय आणि कशाप्रकारे आवाज उठवतात ते पाहावे लागणार आहे. कारण अगोदरच टोलचे दर भरमसाठ वाढलेले आहेत, त्यात आता हि भर पडणार आहे. त्यामुळे अधिकच भार पडणार आहे.