AMUL MILK RATE : अमूल दुधाच्या किमतीत वाढ; इतर दूध संघही दरवाढ करण्याची शक्यता

अमूल दुधाच्या किमतीत वाढ; इतर दूध संघही दरवाढ करण्याची शक्यता
Amul Milk : लोकसभा निवडणुकीतनंतर लगेच देशात अनेक गोष्टींच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर आज दि.३ जुन पासून लागू करण्यात आले आहेत. सुमारे आता मोलणाऱ्या दुधाच्या दरामध्ये १ ते २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असल्याचे दिसतेय. तसेच इतर दूध संघ देखील आपल्या दुधाच्या दरांमध्ये वाढ करण्यात असल्याचे म्हटले जात आहे.
नव्या किमतींनुसार प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अर्धा लिटर दुधावर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. मूळ खर्चात वाढ झाल्याने कंपनीने दुधाच्या किंमतीमध्ये वाढ केली असल्याचे म्हटले आहे. फेब्रुवारी 2023 पासून दुधाचे दर वाढवले गेले नव्हते. ते आता वाढवण्यात आले आहेत.
तसेच ही दूध दर वाढ खाद्यपदार्थांशी संबंधित सरासरी महागाईपेक्षा कमी असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याबाबत पिटीआयने माहिती दिले आहे.